Yashwant Kshirsagar
तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेचा प्रवास चांगला आणि आरामदायी असतो.
पण या प्रवासासाठी प्रवाशांना प्रवासभाडे द्यावे लागते. जे प्रवासाच्या अंतरानुसार ठरलेले असते.
तुम्हीही तिकीट काढून रेल्वेने प्रवास करत असाल.
पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात अशी एक ट्रेन आहे ज्याने मोफत प्रवास करता येतो.
ही रेल्वे पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील रेल्वेमार्गावरुन धावते. तिचे नाव भाक्रा-नांगल ट्रेन आहे.
ही रेल्वेगाडी 13 किलोमीटरचे अंतर पार करते.
भाक्रा नांगल प्रकल्पासाठी साधन सामग्री वाहण्यासाठी ट्रेनची आवश्यकता होती म्हणून 1948 साली ही ट्रेन सुरु करण्यात आली.
मात्र काम संपल्यानंतरही ही ट्रेन मोफत सुरु राहिली, रुटवरील गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक या ट्रेनने प्रवास करतात