Yashwant Kshirsagar
अल्कोहलच्या सेवनामुळे हँगओव्हर होणे ही सामान्य बाब आहे. जर हँगओव्हर सहन होत नसेल, त्या व्यक्तीने मद्यपान न करणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे.
मद्यपानानंतर खूप पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्याने हँगओव्हरचा प्रभाव कमी होतो.
अल्कोहोल सेवनानंतर या नारळ पाणी घेणे केव्हाही चांगले. यामुळे बाॅडीमध्ये मीठ आणि पोटॅशियमची लेवल वाढते. नारळाच्या पाण्यामुळे आपल्या शरीराला इतर फायदेही होतात.
मद्यपान करण्याच्या सुरुवातीलाच तेलकट खाद्यपदार्थ खाल्ले तर हँगओव्हरवर परिणाम होतो असे म्हटले जाते.
नेहमी मद्यपान करत असतानाच गोड खावे किंवा गोड पेय प्यावे, त्यामुळे हँगओव्हर कमी होऊ शकतो.
थर्टी फर्स्ट पार्टीमध्ये मद्यपान केल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी हँगओव्हर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी सकाळी उठल्या-उठल्या लगेच ब्रेकफास्ट करावा.
मद्यपान करण्यापूर्वी आल्याचा छोटा तुकडा किंवा आलेपाक तोंडामध्ये टाकून चघळल्यामुळे हँगओव्हरचा परिणाम कमी होऊ शकतो.
रात्री मद्यपान केल्यावर सकाळी झोपेतून उठल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसल्याचा अनुभव आल्यास पुन्हा झोपणे हा परफेक्ट ऑप्शन मानला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.