Sandeep Shirguppe
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, हा महोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.
गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी विधानसभेत जाहीर केली.
राज्य महोत्सवाच्या एका लोगोचे अनावरण, राज्यात अन् राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
विविध ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन, गणेशोत्सवानिमित्त अध्यात्म नाट्यरंग महोत्सव ठेवण्यात येणार.
घरबसल्या देखावे पाहण्यासाठी पोर्टलची निर्मिती, गणेश मंडळांसाठी तालुकास्तरांवर स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
गणेशोत्सवाचे फोटो, व्हिडिओ क्लिप्ससाठी प्लॅटफॉर्म, गणपतीशी संबंधित सांस्कृतिक चित्रपटांचा गौरव होणार
गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणी, संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्सची स्पर्धा
एका ड्रोनशोचे आयोजन, माध्यमांतून जोरदार प्रसिद्धी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम.
राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन विसर्जन सोहळ्यासाठी विविध सोयी सुविधा परकी विद्यार्थ्यांसाठी महोत्सवाच्यानिमित्ताने योजना