Aarti Badade
डायबिटीजसाठी वरदान ठरलेलं फळ - मॉन्क फ्रूट! मॉन्क फ्रूट हे एक छोटे, गोलसर आणि हिरवट रंगाचे फळ. चीनमध्ये उत्पत्ती. अत्यंत गोड पण तरीही शुगर फ्री!
या फळात नैसर्गिक गोडवा असतो, पण ते रक्तातील साखर पातळी वाढवत नाही.
या फळात असतो मोग्रोसाइड्स नावाचा घटक. यामुळे फळाला मिठास मिळतो आणि ब्लड शुगरवर परिणाम होत नाही.
झिरो कॅलरीज , झिरो कार्बोहायड्रेट, झिरो ग्लायसेमिक इंडेक्स हे सगळं डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं मॉन्क फ्रूटला सुरक्षित मानलंय. गर्भवती महिलांसाठीही योग्य.
या फळाचा अर्क वापरून तयार होतो 'Monk Fruit Sweetener'. हा साखरेपेक्षा 250 पट अधिक गोड!
चहा, कॉफी, ब्रेकफास्टमध्ये वापरू शकता. गोडवा मिळतो पण वजन वाढत नाही.
हे स्वीटनर शरीरात शोषित होत नाही. थेट मूत्रमार्गाने बाहेर पडतं. त्यामुळे साइड इफेक्ट नाहीत.
स्टडीमध्ये आढळलं की मॉन्क फ्रूट अर्काने गळा व कोलन कॅन्सर वाढण्याची शक्यता कमी होते.
स्वाभाविक गोडवा, कोणतेही दुष्परिणाम नाहीत, आणि अनेक आरोग्य फायदे.