Aarti Badade
थायरॉईड शरीराचा एक छोटासा, पण अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हे तुमच्या चयापचय, ऊर्जा, आणि मूडवर प्रभाव टाकते.
थायरॉईडच्या आरोग्यासाठी औषधांसोबत योग्य आहार महत्त्वपूर्ण असतो.काही पदार्थ तुमचे थायरॉईड आरोग्य सुधारू शकतात आणि लवकर आराम मिळवू शकतात.
नारळ तेल तुमच्या थायरॉईडसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. फॅटी अॅसिडमुळे हे संप्रेरकांचे कार्य सुधारते आणि तुम्हाला ऊर्जा देते.
दह्यात असलेल्या आयोडीन आणि झिंकमुळे थायरॉईड नियंत्रित करणे सोपे होऊ शकते. दही तुमच्या शरीरासाठी उत्तम पोषण पुरवते.
भोपळ्याच्या बिया झिंकने समृद्ध असतात. झिंक थायरॉईड ग्रंथीला हार्मोन्स तयार करण्यास मदत करते.
मेथीचे दाणे तुमच्या थायरॉईडसाठी खूप फायदेशीर आहेत. हे हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात आणि कार्य सुधारतात.
मूग डाळ थायरॉईडसाठी उत्तम आहे, कारण ती वनस्पती-आधारित प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बी प्रदान करते. हे पोषक तत्त्व हार्मोनल संतुलन राखण्यास आणि ऊर्जा स्थिर ठेवण्यास मदत करतात.
आहारात कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.