Varsha Balhe
वाघ आणि बिबट्या एकाच जंगलात राहू शकतात. पण हे दोघे समोरासमोर आले तर काय होतं? त्यांच्यात लगेच लढाई होते की बिबट्या माघार घेतो? जाणून घेऊया.
TIGER VS LEOPARD
esakal
वाघ हा बिबट्यापेक्षा आकाराने मोठा आणि वजनाने जड असतो. त्यामुळे दोघे समोर आले तर वाघाला ताकदीचा फायदा मिळतो.
TIGER VS LEOPARD
esakal
वाघ समोर आल्यावर बिबट्या अनेकदा त्याच्याशी संघर्ष करण्याऐवजी दूर जाण्याचा प्रयत्न करतो. कारण थेट लढाई त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
TIGER VS LEOPARD
esakal
नाही, प्रत्येक वेळी दोघांमध्ये लढाई होतेच असं नाही. परिस्थितीनुसार दोन्ही प्राणी एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू शकतात.
TIGER VS LEOPARD
esakal
काही परिस्थितींमध्ये वाघ बिबट्यावर हल्ला करू शकतो. विशेषतः दोघांमध्ये संघर्ष झाल्यास बिबट्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
TIGER VS LEOPARD
esakal
बिबट्या अतिशय चपळ असतो आणि त्याला झाडावर चढता येतं. त्यामुळे धोका जाणवल्यास तो तिथून निसटण्याचा प्रयत्न करू शकतो.
TIGER VS LEOPARD
esakal
दोघांची शिकार किंवा अन्न मिळवण्याची जागा एकच असेल, तर त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता असते. मात्र प्रत्येक वेळी असंच घडतं असं नाही.
TIGER VS LEOPARD
esakal
आकार आणि ताकदीच्या बाबतीत वाघ वरचढ असतो. पण बिबट्याची चपळाई आणि परिस्थितीनुसार माघार घेण्याची क्षमता त्याला स्वतःचा बचाव करण्यास मदत करते.
TIGER VS LEOPARD
esakal
LEOPARD VS JAGUAR DIFFERENCES
esakal