वाघ आणि सिंह यांच्यात काय फरक असतो?

Varsha Balhe

वाघ आणि सिंह

वाघ आणि सिंह हे दोघेही ताकदवान आणि हिंस्र प्राणी आहेत. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, तर वाघही आपल्या ताकदीसाठी ओळखला जातो. पण या दोघांच्या शरीराची रचना, राहण्याची पद्धत आणि शिकार करण्याची सवय यात बरेच फरक आहेत.

TIGER VS LION

|

esakal

आकार

वाघ आणि सिंह दोघेही मोठे असतात. वाघाची काही उपजाती आकाराने मोठी आणि वजनदार असतात. दोघांची ताकद आणि चपळाई त्यांच्या शरीराच्या रचनेवर अवलंबून असते.

TIGER VS LION

|

esakal

अंगावरील पट्टे

वाघाच्या शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. या पट्ट्यांमुळे त्याला जंगलात लपून राहण्यास मदत होते. सिंहाच्या अंगावर वाघासारखे पट्टे नसतात. त्याच्या शरीराचा रंग साधारण पिवळसर किंवा तपकिरी असतो.

TIGER VS LION

|

esakal

आयाळ

नर सिंहाच्या डोक्याभोवती आणि मानेवर दाट केस असतात. यालाच आयाळ म्हणतात. वाघाच्या शरीरावर अशी आयाळ नसते. यामुळे सिंह आणि वाघ यांना सहज ओळखता येतं.

TIGER VS LION

|

esakal

पद्धत

सिंह अनेकदा कळपात राहतात. या कळपात नर, मादी आणि त्यांची पिल्लं असतात. याउलट, वाघ सहसा एकटाच राहतो. तो स्वतःच्या भागात फिरतो आणि एकटाच शिकार करतो.

TIGER VS LION

|

esakal

शिकार करण्याची पद्धत

सिंहांच्या कळपात सिंहिणी प्रामुख्याने शिकार करतात. सिंहही शिकार करतो. वाघ मात्र दबा धरून बसतो आणि योग्य संधी मिळताच अचानक हल्ला करतो.

TIGER VS LION

|

esakal

कुठे राहतात?

सिंह प्रामुख्याने गवताळ प्रदेश आणि विरळ जंगलांमध्ये आढळतात. भारतात गुजरातमधील गिरच्या जंगलात आशियाई सिंह आढळतात. वाघ मात्र भारतासह इतर देशांतील वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलांमध्ये राहतात.

TIGER VS LION

|

esakal

पाणी कोणाला आवडतं?

वाघांना पाण्यात उतरणं, पोहणं आणि पाण्यात बसणं आवडतं. सिंहही पाण्यात उतरू शकतात; मात्र वाघ पाण्याशी अधिक सहजपणे जुळवून घेतात

TIGER VS LION

|

esakal

बिबट्या आणि चित्ता यात काय फरक असतो?

LEOPARD VS CHEETAH

|

esakal

येथे क्लिक करा