वाघ vs सिंह शिकार करण्याची पद्धत इतकी वेगळी का?

Varsha Balhe

वाघ vs सिंह

वाघ आणि सिंह दोघेही शक्तिशाली शिकारी आहेत. पण वाघ एकट्याने तर सिंह कळपाने शिकार करतो. यामागे त्यांची जीवनशैली, अधिवास आणि शरीररचना ही प्रमुख कारणं आहेत.

TIGER VS LION

|

esakal

वाघ

वाघ बहुतांश वेळा एकटाच राहतो. त्यामुळे शिकार करताना त्याला कोणाचीही मदत मिळत नाही.

TIGER VS LION

|

esakal

हल्ला

घनदाट जंगल आणि उंच गवतामध्ये वाघ सहज लपतो. तो भक्ष्याच्या जवळ दबा धरून बसतो आणि योग्य संधी मिळताच अचानक हल्ला करतो.

TIGER VS LION

|

esakal

ताकद

वाघ आपल्या पुढच्या पायांच्या ताकदीने भक्ष्याला खाली पाडतो. त्यानंतर मानेवर किंवा घशाजवळ चावा घेऊन शिकार करण्याचा प्रयत्न करतो.

TIGER VS LION

|

esakal

सिंह

सिंह कळपात राहतो आणि विशेषतः सिंहिणी मिळून शिकार करतात. त्यामुळे शिकार करताना त्यांना एकमेकांची मदत मिळते.

TIGER VS LION

|

esakal

रणनीती

मोकळ्या गवताळ प्रदेशात लपण्यासाठी कमी जागा असल्याने सिंहिणी मिळून भक्ष्याला घेरतात. काही सिंहिणी त्याचा पाठलाग करतात, तर काही पुढून किंवा बाजूने पकडण्याचा प्रयत्न करतात.

TIGER VS LION

|

esakal

पद्धत

वाघाची शिकार मुख्यतः दबा धरून आणि अचानक हल्ला करण्यावर अवलंबून असते. सिंह मात्र संधी मिळाल्यावर कळपाच्या मदतीने भक्ष्याला घेरून खाली पाडतो.

TIGER VS LION

|

esakal

कारण

वाघाची एकट्याने राहण्याची सवय आणि जंगलातील अधिवास यामुळे त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तर सिंहाचा कळपातील जीवनक्रम आणि मोकळा अधिवास यामुळे तो सहकार्याने शिकार करतो.

TIGER VS LION

|

esakal

माणसांप्रमाणेच हा प्राणीही अनाथ पिल्लांना दत्तक घेतो!

THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES

|

esakal

येथे क्लिक करा