Apurva Kulkarni
पुण्यापासून 60 किमी अंतरावर असलेला किल्ले तिकोना 3850 फूट उंचावर आहे. किल्ल्याचा आकार त्रिकोनी असल्याने त्याला तिकोना किल्ला म्हटलं जातं.
Tikona Fort
esakal
तिकोना गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नसला तरी, 11 जून 1665 झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यापैंकी हा एक तिकोना किल्ला आहे.
Tikona Fort
esakal
कालातंराने औरंगजेबाकडे हा किल्ला येताच त्याने या गडाचं नाव 'अमनगड' असं ठेवलं. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा तो मराठ्यांकडे आला.
Tikona Fort
esakal
तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यामध्ये जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात
Tikona Fort
esakal
पुणे जवण नं १ ही बस गडाच्या पायथ्यापासून घेऊन जेते. किंवा तुम्ही लोणावळा दुधिवरे खिंड मार्गाद्वारे तिकोनाला जाऊ शकतात.
Tikona Fort
esakal
या किल्ल्यावर कोणत्याही खाण्यापिण्याची सोय नसल्यानं किल्ल्यावर जाताना सोबत सर्व गरजेच्या वस्तू घेऊन जावे लागेल.
Tikona Fort
esakal
तसंच हा किल्ला चढत असताना किल्ल्यावर दर्शविलेल्या वाटेवरुन किल्ल्याची चढाई करावी. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता आहे.
Tikona Fort
esakal
महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला! बंधाऱ्याच्या आतमध्ये दडलाय जलमहाल
Naldurg Fort
esakal