Aarti Badade
हिवाळ्याच्या थंडीत शरीर गरम ठेवण्यासाठी आणि भोगीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'तीळ-बाजरीची भाकरी' हा एक उत्तम पौष्टिक पर्याय आहे.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
ही भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि पीठ मळण्यासाठी कोमट पाणी एवढेच साहित्य पुरेसे आहे.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
प्रथम पांढरे तीळ हलके भाजून घ्या. थोडे तीळ कुटून पिठात मिसळल्यास भाकरीला खमंग चव आणि अप्रतिम सुगंध येतो.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
बाजरीच्या पिठात मीठ आणि तीळ मिसळून कोमट पाण्याचा वापर करून पीठ मऊसर मळून घ्या. पीठ जितके चांगले मळाल, तितकी भाकरी मऊ होईल.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
पिठाचा मध्यम गोळा घेऊन परातीत कोरडे पीठ टाकून हाताने हलक्या हाताने भाकरी थापा. भाकरी थोडी जाडसर ठेवली तर ती अधिक चविष्ट लागते.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
भाकरी थापून झाली की, वरच्या बाजूने थोडे पाणी लावून त्यावर भरपूर तीळ पसरवा आणि हलक्या हाताने दाबून घ्या जेणेकरून तीळ चिकटून राहतील.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
गरम तव्यावर भाकरी टाकून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. भाकरी भाजताना पाण्याचा हात लावल्यास ती कडक होत नाही.
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
तयार गरम भाकरीवर साजूक तूप सोडा. ही भाकरी भोगीच्या मिक्स भाजीसोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत अप्रतिम लागते!
Til Bajra Bhakri Recipe
Sakal
Bhogi Bhaji Recipe
Sakal