सकाळ डिजिटल टीम
स्फोटक फलंदाज तिलक वर्माने काल इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतासाठी विजयी खेळी केली.
५५ चेंडूत ७२ धावांची खेळी करत त्याने अटीतटीच्या सामन्यात भारताच्या पारड्यात विजय खेचून आणला.
या अर्धशतकासह त्याने सलग ४ डावात नाबाद ३१८ धावा करण्याचा विश्वविक्रम रचला.
त्याचबरोबर तो २१ डावात सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
२१ डावात ७६८ धावा करणारा केएल राहुल या यादीत अव्वल स्थानी आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने २१ डावात ७१३ धावा केल्या आहेत, तर तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
७०७ धावांसह तिलक वर्माने यादीत आता तिसरे स्थान मिळवले आहे.
६७७ धावा करणारा स्टार खेळाडू विराट कोहली यादीत चौथ्या स्थानी आहे.
तर ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने ६७२ धावांसह यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.