सकाळ डिजिटल टीम
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग व पत्नी आरती अहलावतसोबत घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सेहवाग व आरती मागच्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत.
आरती अहलावत व विरेंद्र सेहवाग दोघांचाही जन्म दिल्लीतला.
आरतीने लेडी इरविन सेंकडरी स्कूल व भारती विद्याभवनमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्ली युनिव्हर्सिटीमधून कम्प्यूटर सायन्समध्ये डिप्लोमा केला.
सेहवागने अरोडा विद्या स्कूलमधून आपले १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जामिया मिलिया इस्मालिया युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली.
सेहवाग व आरती लहानपणापासूनच एकमेकांना ओळखायचे. पहिल्या भेटीतच ते एकमेकांची चांगली मैत्री झाली.
मैत्रीची रुपांतर नंतर प्रेमात झाले व त्यांनी २००४ मध्ये लग्न केले.
या जोडप्याला २ मुलं आहेत. एकाचे नाव आर्यवीर आहे, तर दुसऱ्याचे नाव वेदांत आहे.