Aarti Badade
चिलापी हा चवीला अतिशय चविष्ट आणि शिजायला सोपा असा मासा आहे. आज आपण हा मासा फ्राय करण्याच्या दोन लोकप्रिय आणि घरगुती पद्धती पाहणार आहोत.
Chilapi Fish Fry recipe
Sakal
कोणतीही पद्धत निवडा, सुरुवातीला माशांना हळद, मीठ, लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट आणि लाल तिखट लावून २०-३० मिनिटे ठेवा. यामुळे मसाल्यांची चव माशाच्या आतपर्यंत पोहोचते.
Chilapi Fish Fry recipe
Sakal
बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ मासे आवडत असतील, तर 'रवा फ्राय' सर्वोत्तम आहे. यासाठी एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घेऊन त्यात थोडे मीठ व तिखट मिसळा.
Chilapi Fish Fry recipe
Sakal
मॅरीनेट केलेले चिलापी माशाचे तुकडे रवा-पीठाच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी घोळवून घ्या. तव्यावर तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत १०-१२ मिनिटे फ्राय करा.
Chilapi Fish Fry recipe
sakal
मसाला प्रेमींसाठी 'गावरान तवा फ्राय' हा उत्तम पर्याय आहे. यासाठी लाल तिखट, धने-जिरे पूड, हळद, गरम मसाला आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करून जाडसर मसाला तयार करा.
Chilapi Fish Fry recipe
Sakal
हा तयार मसाला चिलापी माशांना लावताना त्यावर दिलेल्या खोल कापांमध्ये (Cuts) नीट भरा. यामुळे मासा खाताना प्रत्येक घासाला मसाल्याची चविष्ट फोडणी जाणवेल.
Chilapi Fish Fry recipe
sakal
तव्यावर तेल गरम करून मासे ५ मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजवा आणि नंतर झाकण काढून ५ मिनिटे खरपूस तळा. तयार आहे तुमचा चमचमीत गावरान चिलापी तवा फ्राय!
Chilapi Fish Fry recipe
Sakal
Kolambi Chilli
sakal