Anuradha Vipat
टीना आहुजाने मासिक पाळीबद्दल वक्तव्य केलं आहे.
टीनाच्या या वक्तव्याची सध्या खूप चर्चा होत आहे.
टीनाने मासिक पाळीच्या वेदना फक्त मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमधील महिलांना होतात. असं म्हटलं आहे
लहान शहरांमध्ये महिलांना पाळी कधी येते, कधी जाते हेही माहीत नसतं. तसेच पिरियड क्रॅम्प्स हे मानसिक असतात असा दावाही टीनाने केला आहे .
मासिक पाळीदरम्यान महिलांना जो त्रास होतो, त्याला महिलांच्या आहाराच्या सवयींना कारणीभूत असल्याचं मत टीनाने मांडलं.
टीना म्हणाली की, “मला मासिक पाळीत पाठदुखी होत नाही. मला क्रॅम्प्सही येत नाहीत. पण, मी बऱ्याचदा मुलींना त्याबद्दल बोलताना ऐकते.
पुढे टीना म्हणाली की, तुम्ही तूप खा, तुमचा आहार सुधारा, गरज नसताना डायटिंग करू नका, नीट झोपा. हे केल्याने सगळं ठीक होतं. बहुतेक मुलींना डाएटिंगमुळेही त्रास होतो.