सूरज यादव
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्टच्या आत्मचरित्रामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आत्मचरित्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘Mind The Windows – My Story’ या आत्मचरित्रात बेस्टने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
स्वतःला ‘ब्लॅक ब्रॅड पिट’ म्हणवणाऱ्या टिनोने ५०० पेक्षा अधिक महिलांशी शारीरिक संबंध असल्याची कबुली दिली.
जगातील सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियात आहेत, असं म्हणत तिथल्या महिलांविषयी विशेष आकर्षण असल्याचं टिनोने म्हटलं.
पहिलं प्रेम मेलिसा होती, पण नातं बिघडलं. त्यानंतर स्वत:ला प्लेबॉय बनवल्याची कबुली टिनोने दिली. या प्रतिमेचा करिअरवर परिणाम झाला नाही असंही तो म्हणालाय.
कसोटीत २५ सामने, ५७ विकेट; वनडेत २६ सामने, ३४ विकेट; प्रथम श्रेणीत फक्त ५ सामन्यात १७ विकेट!Cricketer Reveals 500 Affairs, No Career affects
२००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टिनोने ११ चेंडूत ४ विकेट घेतल्या होत्या. तरी संघाला पराभवाचा धक्का बसला होता.