Mansi Khambe
पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर अधिक प्रमाणात तेल तयार होते. यामुळे चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसू लागतो.
अशावेळी चेहऱ्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे ते जाणून घ्या.
पावसाळ्यात वातावरणामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. त्यामुळे दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात त्वचा निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे हलके, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करेल.
पावसाळ्यातही सूर्यप्रकाश हानिकारक असू शकतो. त्यामुळे दररोज सनस्क्रीन लावणे फायदेशीर आहे.
लिंबाचा रस, कोरफड, मध, दही या गोष्टी चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.
पावसाळ्यात, ताजी फळे, भाज्या आणि काजू यासारखे पौष्टिक आहाराने चेहऱ्याची त्वचा निरोगी राहते.
वरील माहिती प्रेक्षक-वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी दिली आहे. अशा गोष्टींची पुष्टी करत नाही.