Aarti Badade
प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन अधिक खास करण्यासाठी यंदा भारतीय ध्वजाच्या रंगात बनवलेली ही स्वादिष्ट 'तिरंगा बर्फी' नक्की ट्राय करा.
Tiranga Mawa Barfi
Sakal
यासाठी मावा (खोया), साखर, वेलची पावडर, केशर (केशरी रंगासाठी) आणि पिस्ता (हिरव्या रंगासाठी) इत्यादी साहित्य तयार ठेवा.
Tiranga Mawa Barfi
Sakal
एका कढईत मावा आणि साखर एकत्र करून मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा; त्यात वेलची पावडर घालून सुवासिक करा.
Tiranga Mawa Barfi
Sakal
तयार झालेल्या माव्याच्या मिश्रणाचे तीन समान भाग करा, जेणेकरून आपल्याला ध्वजाचे तीन वेगवेगळे रंग तयार करता येतील.
Tiranga Mawa Barfi
Sakal
एका भागात केशर किंवा केशरी रंग, दुसरा भाग पांढरा ठेवा आणि तिसऱ्या भागात वाटलेला पिस्ता किंवा हिरवा रंग मिसळून रंग तयार करा.
Tiranga Mawa Barfi
Sakal
तूप लावलेल्या साच्यात सर्वात खाली हिरवा, मध्ये पांढरा आणि सर्वात वर केशरी थर देऊन व्यवस्थित दाबून सेट करा.
Tiranga Mawa Barfi
Sakal
ही बर्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तिचे काप पाडणे सोपे होईल.
Tiranga Mawa Barfi
Sakal
बर्फी सेट झाल्यावर तिचे चौकोनी तुकडे करा; तुमची आकर्षक तिरंगा बर्फी गणतंत्र दिनाच्या सेलिब्रेशनसाठी तयार आहे!
Tiranga Mawa Barfi
Sakal
Tilgul Poli recipe
Sakal