Aarti Badade
मान्सूनमध्ये डासांची संख्या वाढते, त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका अधिक होतो.
घरात वापरले जाणारे कॉइल, स्प्रे, मच्छरदाणी यामध्ये रसायनं असतात. त्याऐवजी नैसर्गिक उपाय वापरणं फायदेशीर ठरतं.
लॅव्हेंडर तेलाचा सुगंध डासांना आवडत नाही. त्वचेवर हे तेल लावल्यास डास जवळ येत नाहीत.
कापूर जाळल्यावर येणाऱ्या धुरामुळे डास दूर पळतात. हा उपाय रात्री झोपताना खूप उपयुक्त ठरतो.
पुदिन्याची पाने पाण्यात उकळा आणि तो स्प्रे घरात फवारा. डास दूर राहतात आणि हवाही ताजी वाटते.
लसूण बारीक करून पाण्यात मिसळा आणि त्याचा स्प्रे तयार करा. त्याचा वास डासांना दूर ठेवतो.
कडुलिंबाचं तेल त्वचेवर लावल्यास किंवा पाण्यात मिसळून घरात फवारल्यास डासांचा त्रास कमी होतो.
आरोग्यास हानिकारक रसायनांऐवजी हे घरगुती उपाय प्रभावी आणि सुरक्षित ठरतात.