सकाळ डिजिटल टीम
झोपे दरम्यान श्वसन मार्गातील मुलायम टिश्यूंमुळे कंपन निर्माण होतो, ज्यामुळे घोरण्याचा आवाज येतो.
दारू सेवनामुळे श्वसन मार्गाची लवचिकता कमी होते, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात आणि घोरणं वाढतं.
पाठ टेकून झोपल्यास जीभ आणि हनुवटीमुळे श्वसन मार्गात अडथळा येतो. कुशी बदलून झोपल्याने घोरणं कमी होऊ शकते.
नाकपट्टी वापरणे नाकपुड्या खुल्या ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे नाकाने घोरताना होणारा आवाज कमी होतो.
सर्दी किंवा अॅलर्जीमुळे चोंदलेले नाक घोरण्याचे कारण ठरू शकते. झोपण्यापूर्वी नाक स्वच्छ करा आणि औषधांचा वापर करा.
वजन जास्त असल्यास हनुवटीखाली चरबी जमा होऊन श्वसन मार्गात अडथळा येतो. वजन कमी केल्याने घोरणं कमी होऊ शकते.
श्वसन मार्ग खुला ठेवण्यासाठी योगा, नाकपट्ट्या, किंवा इतर उपायांचा वापर करा, ज्यामुळे घोरणं थांबवता येईल.