Vinod Dengale
तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज कोट्यवधी रुपयांचा दान येत.
भक्त केवळ रोख रक्कमच नाही तर सोनं, चांदी, मौल्यवान दागिनेही दान करतात.
मंदिरात रोज हजारो किलो सोनं जमा होतं. पण ते सगळं मंदिराच्या तिजोरीतच राहतं का?
तिरुमाला तिरुपति देवस्थानकडून मंदिरातील दानपेट्या ह्या कडक सुरक्षेत सील करून 'पराकमणी भवन' या खास ठिकाणी नेल्या जातात.
याच ठिकाणी CCTV देखरेखीखाली दानपेटयांतील सर्व दानाची मोजणी केली जाते. यात नोटा, नाणी, सोनं, चांदी आणि दागिने वेगवेगळे केले जातात.
अनेकांना वाटतं की हे सोनं मंदिराच्या तिजोरीत कायमच राहत असेल. पण प्रत्यक्षात गोष्ट वेगळी आहे.
मंदिरातील काही सोन्याचे दागिने वितळवून त्याचे सोन्याचे बिस्किट म्हणजेच गोल्ड बार तयार केले जातात.
त्यानंतर मंदिर प्रशासन हे सोनं राष्ट्रीयीकृत बँकांच्या Gold Deposit Scheme मध्ये जमा करतं.
बँकेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला व्याज मिळतं. या उत्पन्नाचा वापर विविध धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कल्याणकारी कामांसाठी केला जातो.
Why is Lohagad Fort called Lohagad?
esakal