Monika Shinde
दररोज लाखो भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शनानंतर भक्तांना प्रसाद म्हणून तिरुपती लाडू मिळतात.
हा लाडू केवळ स्वादिष्ट नाही, तर त्यात भगवान वेंकटेश्वरांचे आशीर्वादही आहेत.
तिरुपती लाडू, ज्याला 'श्रीवरी लाडू' असेही म्हणतात, हे मंदिराच्या स्वयंपाकगृहात तयार केले जातात. त्यात शुद्ध तूप, काजू, किशमिश, वेलची अशा दर्जेदार घटकांचा समावेश असतो.
तिरुपती मंदिरात दररोज सुमारे ३ लाख हुन अधिक लाडू बनवले जातात.
लाडू बनवताना मंदिरात स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन केले जाते. प्रत्येक लाडू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याची गुणवत्ता नेहमी उत्तम ठेवली जाते.
फ्री दर्शन (सर्व दर्शन) घेणाऱ्या भाविकांना फ्री एक लाडू दिले जाते. तर स्पेशल एंट्री दर्शन (३०० रु. पास) १ लाडू मिळतो. तर VIP दर्शन घेणाऱ्या भक्तांना २ लाडू दिले जातात.
जर तुम्हाला एक्सट्रा लाडू विकत घ्यायचे असतील, तर प्रत्येक व्यक्तीला फक्त १० लाडू मिळतात, तेही प्रति ५० रु. किंमत आहे.