Sandeep Shirguppe
पावसाळ्यात शरिराला ऊर्जावान बनवण्यासाठी गूळ-फुटाण्याचे सेवन करायला हवं.
हृदय ते हाडं मजबूत करण्यावर रामबाण उपाय म्हणून गूळ-फुटाण्याचे सेवन करावं.
पूर्वी पाहुणे लांबून आल्यावर गूळ आणि फुटाणे हातावर ठेवून सशक्त केले जायचे.
गुळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात.
भाजलेल्या फुटाण्यांसोबत थोडा गूळ खाल्ल्यास ते शरीरासाठी औषध म्हणून कार्य करते.
शरीरात हिमोग्लोबीनची मात्रा पूर्ण करण्यासाठी त्यांनी दररोज गूळ व फुटाणे खाणे गरजेचे आहे.
दैनंदिन कामात उत्साह राहण्यासाठी गूळ आणि फुटाणे रोज खायला हवं.
हाडे मजबूत करण्यासाठी दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खावा.