kimaya narayan
उद्या 21 सप्टेंबर 2025 ला सर्वपित्री अमावस्या आहे. उद्या पूर्वजांची पूजा करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस आहे.
Sarvapitri Amavasya Remedies
सर्वपित्री अमावस्येदिवशी असं म्हटलं जातं की सर्व पितर पृथ्वीवर येतात. या दिवशी जर त्यांची आठवण काढली, त्यांचे आशीर्वाद घेतले तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात.
Sarvapitri Amavasya Remedies
आज जाणून घेऊया पाच उपाय जे तुम्ही सर्वपित्री अमावस्येदिवशी करू शकता. ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची कृपा होते.
Sarvapitri Amavasya Remedies
उद्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर घरातील ईशान्य कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावणे शुभ मानलं जातं. दिव्यात थोडेसे काळे तीळ टाकून हा दिवा प्रज्वलित केल्याने घरात शांतता टिकून राहते. घरात सकारात्मकता टिकून राहते आणि धनवृद्धी होते.
Sarvapitri Amavasya Remedies
पितृपक्षादिवशी ब्राह्मणभोजन करणे विशेष फलदायी आहे. या भोजनात पितरांच्या आवडीच्या वस्तू बनवाव्यात. याशिवाय जेवणानंतर ब्राह्मणांना दक्षिणा, वस्त्र किंवा उपयोगी वस्तूंचं दान करा. पूर्वज प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील.
Sarvapitri Amavasya Remedies
आज पशु पक्ष्यांना अन्नदान करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी गाय, कुत्रा, मुंग्या यांच्यासाठी वेगळं पान वाढलं जात. यामुळे पितृ तृप्त होतात आणि पितृदोष कमी होतो.
Sarvapitri Amavasya Remedies
या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. तुलसी मातेला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
Sarvapitri Amavasya Remedies
आजच्या दिवशी पितरांची पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे पितृदोष कमी होतो.
Sarvapitri Amavasya Remedies
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Sarvapitri Amavasya Remedies
Mulank 5 People