प्रमाणापेक्षा जास्त आवळे खाल्ले तर होतात 'हे' परिणाम

Anushka Tapshalkar

जास्त आवळा खाणं

आवळा पौष्टिक असला तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडू शकतात. जाणून घ्या हे ७ दुष्परिणाम.

Eating Excessive Amla

|

sakal

पोटदुखी, अॅसिडिटी आणि गॅस

आवळ्यातील उच्च प्रमाणातील फायबर आणि आम्लीय स्वरूपामुळे पोटात त्रास होऊ शकतो. यामुळे फुगणे, पोटात मुरडा, वायू, तसेच अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

Gut Problems

|

sakal

ब्लड शुगर अचानक कमी होऊ शकते

आवळ्यात रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते. डायबेटिससाठी औषधे घेतल्यास साखरेची पातळी अतिशय कमी होऊ शकते. यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे आणि मेंदू धूसर होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Low Blood Sugar

|

sakal

वारंवार लघवी व शरीरात पाणी कमी

आवळा हा नैसर्गिक मूत्रवर्धक आहे. त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि त्वचा कोरडी पडणे यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

Peeing Constantly

|

sakal

त्वचा व टाळू कोरडे होणे

अतिप्रमाणात आवळा सेवन केल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते. यामुळे टाळूला खाज येणे, त्वचा कोरडी होणे आणि ओठ कोरडे पडणे असे परिणाम दिसू शकतात..

Dry Skin

|

sakal

लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी धोकादायक

आवळ्यात रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. लक्षणांमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा आणि उभे राहिल्यावर दृष्टी धूसर होणे यांचा समावेश होतो.

Low Blood Pressure

|

sakal

योग्य मात्राच महत्त्वाची!

दररोज एक ते दोन आवळे घेणे पुरेसे आहे. जर तुम्ही त्याचा रस, कच्चा आवळा किंवा पावडर/गोळ्या यांचे अधिक प्रमाणात सेवन करत असाल, तर शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष द्या. संतुलन राखा आणि आरोग्याची काळजी घ्या.

Eat Moderate

|

sakal

ग्लो, स्ट्रेंथ आणि हेल्थसाठी बीटाच्या रसाच्या ७ वेगवेगळ्या रेसिपीज

7 Types of Beetroot Juice for Hair and Skin

|

akal

आणखी वाचा