Aarti Badade
लठ्ठपणा हा स्वतः एक आजार नसला तरी, तो शरीरातील अनेक जीवघेण्या आजारांचे मुख्य कारण ठरतो. वेळीच नियंत्रण न मिळवल्यास शरीर आजारांचे घर बनू शकते.
Health Risks of Obesity
Sakal
वाढलेल्या वजनामुळे शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होतो, ज्यामुळे मधुमेह जडतो. तसेच, अतिरिक्त चरबीमुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
Health Risks of Obesity
Sakal
लठ्ठ व्यक्तींमध्ये हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि ब्लड प्रेशर सतत वाढलेले राहते.
Health Risks of Obesity
Sakal
पोटाची चरबी वाढल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होते (NAFLD). तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनी निकामी होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो.
Health Risks of Obesity
sakal
शरीराचे पूर्ण ओझे गुडघे आणि पाठीच्या कण्यावर पडते. यामुळे सांध्यांची झीज होऊन संधीवात (Arthritis) सुरू होतो आणि हालचाल करणे कठीण होऊन बसते.
Health Risks of Obesity
Sakal
गळ्याजवळ चरबी वाढल्याने झोपेत श्वास थांबण्याची समस्या म्हणजेच स्लीप एपनिया उद्भवतो. धक्कादायक म्हणजे लठ्ठपणामुळे स्तन, किडनी आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.
Health Risks of Obesity
Sakal
लठ्ठपणामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते. यामुळे PCOD/PCOS सारख्या समस्या आणि वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो.
Health Risks of Obesity
Sakal
वाढलेल्या वजनामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि शरीराच्या बनावटीवरून येणाऱ्या न्यूनगंडामुळे व्यक्ती नैराश्य (Depression) आणि मानसिक तणावाखाली जाऊ शकते.
Health Risks of Obesity
Sakal
Surmai Fry Recipe
Sakal