Top Run Scorers 2025 : २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप -10 फलंदाज; भारताचा शुभमन गिल अव्वल

Mayur Ratnaparkhe

शुभमन गिल -

भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल या वर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ४९ च्या सरासरीने १,७६४ धावा केल्या.

शाई होप -

वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक, फलंदाज शाई होपने २०२५ मध्ये ४२ सामन्यांमध्ये १,७६० धावा केल्या.

जो रूट -

 इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट या वर्षी फक्त २४ सामने खेळला. तथापि, या काळात रूटने १५९८ धावा केल्या.

ब्रायन बेनेट -

झिम्बाब्वेचा युवा फलंदाज ब्रायन बेनेटने २०२५ मध्ये १५८५ धावा केल्या.

सलमान अली आघा -

 पाकिस्तानच्या सलमान अली आघाने २०२५ वर्षांत १५६९ धावा केल्या. २ शतके आणि ९ अर्धशतके केली.

करणबीर सिंग -

ऑस्ट्रियाचा करणबीर सिंगचाही यादीत समावेश आहे. त्याने १४८८ धावा केल्या. दोन शतके आणि १३ अर्धशतके केली.

हॅरी ब्रूक -

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४६८ धावा केल्या. ३ शतके आणि ७ अर्धशतके केली.

बेन डकेट -

 इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने या वर्षी ३२ सामन्यांमध्ये १४४८ धावा केल्या.

पथुम निस्सांका -

 श्रीलंकेचा स्फोटक सलामीवीर पथुम निस्सांका २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ सामने खेळला, त्याने १,४१४ धावा केल्या.

रचिन रवींद्र -

 न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने २०२५ मध्ये एकूण ३२ सामने खेळले आणि सर्व फॉरमॅटमध्ये मिळून १,३८२ धावा केल्या.

Next : पार्टीचा हँगओव्हर उतरवायचाय? मग हे उपाय नक्की करा

Party Hangover

|

esakal

येथे क्लिक करा