सकाळ डिजिटल टीम
मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.
पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड घेऊन पसार झाले
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
सासू: “कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !”
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,
तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण
बदलू शकत नाही.
BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा. खांबा घेऊन येतो.
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू !
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
Channel वर म्हैस दिसते.
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..
बायको: अय्या .. सासूबाई !
हेलिकॉप्टर उडता-उडता अचानक खाली पडलं
प्रशिक्षक - काय झालं?
बंड्या - काही नाही… वरती गेल्यावर माला थंडी वाजायला लागली, म्हणून मी पंखा बंद केला.