Mayur Ratnaparkhe
मोनाको हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. येथे एक आलिशान घर खरेदी करण्यासाठी, प्रति चौरस मीटर सरासरी ३८ हजार ८०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३२ लाख रुपये खर्च करावे लागतात.
न्यूयॉर्क शहर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर आहे. येथील उत्तम मालमत्तेची सरासरी किंमत प्रति चौरस मीटर २७ हजार ५०० डॉलर आहे.
जगातील महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगचाही समावेश आहे. येथे घर खरेदी करण्यासाठी सरासरी २६ हजार ३०० अमेरिकन डॉलर्स प्रति चौरस मीटर द्यावे लागतात.
ब्रिटनची राजधानी लंडन देखील या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथील लक्झरी मालमत्तेची सरासरी किंमत प्रति चौरस मीटर २४ हजार अमेरिकन डॉलर्स आहे.
फ्रेंच रिव्हिएरावरील सेंट-जीन-कॅप-फेराट शहर त्याच्या सुंदर विलासी जीवनासाठी ओळखले जाते. येथे मालमत्ता खरेदी करण्याची किंमत प्रति चौरस मीटर सुमारे २१ हजार २०० रुपये आहे.
या यादीत फ्रान्सची राजधानी पॅरिस सहाव्या क्रमांकावर आहे. येथे राहणे देखील खूप महागडे आहे कारण लक्झरी रिअल इस्टेटच्या किमती सतत वाढत आहेत.
स्वित्झर्लंडमधील झुरिच सातव्या क्रमांकावर आहे. येथील जीवनशैली देखील खूप उच्च आहे. स्विस फ्रँक आणि उच्च वेतनामुळे, राहणीमान खूप महाग आहे.
जिनेव्हा हे स्वित्झर्लंडमधील एक शहर आहे आणि ते जगातील आठव्या क्रमांकाचे महागडे शहर आहे. येथेही मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत.
स्वित्झर्लंडमधील बेसेल शहराचाही या यादीत समावेश आहे. येथेही राहणीमान खूप महाग आहे, त्यामुळे रिअल इस्टेटच्या किमती चढ्या राहतात.
स्वित्झर्लंडची राजधानी बर्न या यादीत दहाव्या स्थानावर आहे. येथे राहणे देखील खूप महाग आहे, सामान्य खर्चापासून ते लक्झरी रिअल इस्टेटपर्यंत सर्व गोष्टींच्या किमती खूप जास्त आहेत.