संतोष कानडे
रोमँटिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेले पॅरिस हे शहर. आयफेल टॉवर हे फ्रान्समधील पॅरिस शहरात असलेले जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.
ग्रेट वॉल ही चीनमध्ये असलेली जगातील सर्वात लांब आणि ऐतिहासिक भिंत आहे. तिथे जगभारतून मोठ्या संख्येने पर्यटक जातात.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्याचे जागतिक प्रतीक असलेले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे ठिकाण फारच प्रसिद्ध आहे.
आपल्या देशातील आग्रा या ठिकाणी असलेलं ताजमहल. मुघल बादशहा शाहजहांने आपल्या पत्नीच्या आठवणीत ही वास्तू बांधली.
कोलोसियम हे ठिकाण इटलीच्या रोम शहरात आहे. येथे प्राचीन रोमन साम्राज्याचे जगप्रसिद्ध अवशेष आहेत.
माचू पिचू हे पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये असलेले इंका साम्राज्याचे रहस्यमय शहर आहे. इतिहास संशोधकांसाठी येथे जाणं म्हणजे पर्वणी असते.
इजिप्तमध्ये असलेल्या जगातील सर्वात जुन्या आणि भव्य वास्तू. गिझाचे पिरॅमिड्स हे प्राचीन आश्चर्य आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात गजबजलेले आणि प्रसिद्ध ठिकाण. टाइम्स स्क्वेअर येथे लाखो लोक पर्यटनासाठी जातात.
सिडनी ओपेरा हाऊस हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातले ठिकाण आहे. या पर्यटनस्थळाची जागतिक स्तरावर ओळख आहे.
बुर्ज खलिफा ही संयुक्त अरब अमिराती; दुबई शहरातील जगातील सर्वात उंच इमारत आहे. या सगळी ठिकाणं एकदा तरी बघावी, अशी आहेत.