kimaya narayan
जयपूर संस्थानच्या महाराणी असलेल्या लोकप्रिय राजघराण्यातील स्त्री म्हणजे महाराणी गायत्री देवी.
महाराणी गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील कूच बिहारचे महाराज जितेंद्र नारायण होते तर आई बडोदयाच्या राजकुमारी आणि कूच बिहारच्या महाराणी इंदिरा राजे होत्या.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे महाराणी गायत्री देवींचे आजोबा होते.
गायत्री देवी यांनी लंडन, शांतिनिकेतन आणि स्वित्झर्लंडमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांना इंग्रजी, बंगाली,हिंदी आणि मराठी भाषा अवगत होत्या.
गायत्री देवी या उत्तम घोडेस्वार आणि पोलो प्लेयर होत्या. याशिवाय त्यांना शिकारीची आवड होती.
याशिवाय त्यांना मोठ्या गाड्यांची आवड होती. मर्सिडीज बेंज, रॉल्स रॉईज आणि एक एयरक्राफ्ट या गाड्याही त्यांच्या मालकीच्या होत्या.
गायत्री देवी यांच्या सौंदर्याची चर्चा ही फक्त भारतातच नाही तर परदेशातही होती.
गायत्री देवी यांनी सवाई मान सिंह दुसरे यांच्याशी लग्न केलं. सवाई मान सिंह यांचं हे दुसरं लग्न होतं.
गायत्री देवी यांचं 29 जुलै 2009 मध्ये मृत्यू झाला.