Aarti Badade
लिव्हर हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे मुख्य काम करते. म्हणूनच त्याचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे.
Best vegetables for liver health
Sakal
बीटमध्ये आयर्न, फायबर आणि नायट्रेट्स भरपूर असतात. हे लिव्हरला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते आणि तणावामुळे लिव्हरवर होणारा वाईट परिणाम कमी करते.
Best vegetables for liver health
Sakal
व्हिटॅमिन सी, के आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ब्रोकोली लिव्हरमधील हानिकारक घटक बाहेर काढण्यास आणि पेशींची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.
Best vegetables for liver health
Sakal
जर तुम्हाला ब्रोकोली आवडत नसेल, तर काळजी करू नका! कोबी किंवा फ्लॉवर या भाज्या देखील लिव्हरच्या आरोग्यासाठी तितक्याच प्रभावी आणि फायदेशीर ठरतात.
Best vegetables for liver health
Sakal
कारले कडू असले तरी ते लिव्हरच्या एन्झाईम्सची पातळी सुधारते आणि इन्सुलिन नियंत्रित ठेवते. यामुळे 'फॅटी लिव्हर'चा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Best vegetables for liver health
Sakal
बीटचा रस पिणे किंवा ते कच्चे खाणे उत्तम आहे. इतर भाज्या शिजवून खाव्यात. मात्र, या भाज्या आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळाच खाणे आरोग्यासाठी पुरेसे आहे.
Best vegetables for liver health
Sakal
जंक फूड टाळा आणि या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. जर तुम्हाला आधीच लिव्हरचा काही आजार असेल, तर आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Best vegetables for liver health
sakal
Diabetes Affects Body organs
Sakal