Pranali Kodre
२५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय संघाने सिडनीत झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
या सामन्यात रोहित शर्माने १२५ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
रोहित शर्माचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वनडेतील ४९ सामन्यांमधील ९ वे शतक आहे.
Rohit Sharma
Sakal
त्यामुळे रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
Rohit Sharma
Sakal
सचिन तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ वनडे सामन्यांमध्ये खेळताना ९ शतके केली आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
या यादीत रोहित आणि सचिनच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५३ वनडेत ८ शतके केली आहेत.
Virat Kohli
Sakal
चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे दिग्गज देसमंड हाईन्स असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्द ६४ वनडे सामन्यांत ६ शतके केली आहेत.
Desmond Haynes
Sakal
पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस असून त्याने २२ वनडेत ५ शतके केली आहेत.
Faf du Plessis
Sakal
Rohit Sharma
Sakal