Monika Shinde
आजकाल आपण इंग्रजी, अमेरिकन किंवा रशियन लेखकांची पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचतो, पण त्यातच आपण भारतीय साहित्याचा खरा ठेवा विसरतो.
भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजीतही अशी अनेक पुस्तकं आहेत जी वाचकाला भारावून टाकतात आणि भारतीय संस्कृती, भावना, आणि समाजाचं खरंखुरं प्रतिबिंब दाखवतात.
ही एक हिंदी कादंबरी असून, चंदर आणि सुधा यांच्या नाजूक आणि न बोललेल्या प्रेमकथेवर आधारित आहे. समाजाच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि आतल्या भावनांमधला संघर्ष या कथेतून दिसून येतो. ही कथा सुंदर असली तरी अंतर्मनाला स्पर्श करणारी आणि थोडीशी वेदनादायक आहे.
‘मालगुडी डेज’ हा कथासंग्रह भारतातील छोट्या गावांमधील साध्या, रोजच्या आयुष्याची झलक दाखवतो. मालगुडी हे काल्पनिक गाव असलं, तरी तिथली पात्रं आणि त्यांचे अनुभव आपल्यालाही जवळचे वाटतात.
महाभारत आपण अनेकदा वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं, पण या पुस्तकात ती गोष्ट द्रौपदीच्या दृष्टीकोनातून सांगितली आहे. तिच्या आयुष्यातील संघर्ष, भावना आणि तिचं धैर्य या सगळ्यांचं चित्रण इथे वेगळ्या आणि भावनिक पद्धतीनं केलं आहे.
अमीश यांची 'शिवा ट्रिलॉजी' ही भारतीय पुराणकथांना आधुनिक शैलीत सांगणारी एक आकर्षक मालिका आहे. 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा', 'द सीक्रेट ऑफ द नागाज' आणि 'द ओथ ऑफ द वायुपुत्राज' ही तिची तीन पुस्तकं आहेत. या कथांमध्ये भगवान शिव एक देव न वाटता, माणसासारखा वाटणारा, संघर्ष करणारा नायक म्हणून उभा राहतो.
आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे मानसिक वेदना भोगत असलेल्या एका मुलाच्या जीवनातील अनुभव. बंटीचं जगणे आणि त्याचे भावनिक संघर्ष इतके वास्तविक आहेत की वाचताना मनामध्ये एक वेगळं हळुवार दुःख उमठतं.