संतोष कानडे
उत्तराखंडचा समृद्ध निसर्ग, अध्यात्म आणि अॅडव्हेंचरसाठी ऋषिकेश उत्तम आहे. येथे राहण्यासाठी अनेक स्वस्त आश्रम आणि डॉर्मिटरीज उपलब्ध आहेत.
ऋषिकेशमध्ये गंगा आरती आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही.
गोकर्ण हे ठिकाण कर्नाटकात आहे. गोव्याला पर्याय म्हणून गोकर्ण ओळखले जाते. गोव्याच्या तुलनेत येथील समुद्रकिनारे शांत आणि स्वस्त आहेत.
गोकर्णमध्ये समुद्रकिनारी असलेल्या हटमध्ये राहणे बजेटमध्ये बसते. त्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने जातात.
उत्तर प्रदेश जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेल्या वाराणसीमध्ये राहण्याचा आणि खाण्याचा खर्च खूपच कमी आहे.
वाराणसीमध्ये गंगेच्या घाटावर फिरणे आणि तिथली संस्कृती अनुभवणे हा एक अविस्मरणीय आणि कमी पैशांमध्ये घेता येण्याजोगा अनुभव आहे.
इतिहास आणि वास्तुकलेची तुम्हाला आवड असेल, तर कर्नाटकातलं हम्पीला एक उत्तम पर्याय आहे.
तुंगभद्रा नदीच्या पलीकडे असलेल्या भागात तुम्हाला खूप स्वस्त होमस्टे आणि खाण्याचे पर्याय मिळतील.
उदयपूर हे राजस्थानमध्ये असलेलं राजवाड्यांचं शहर आहे. येथे बजेट ट्रॅव्हलर्ससाठी अनेक पर्याय आहेत.
लेक पिचोलाच्या आसपास असलेल्या जुन्या शहरात स्वस्त गेस्ट हाऊस मिळतात. येथील 'स्ट्रीट फूड' चविष्ट आणि खिशाला परवडणारे आहेत.