भारतातील 5 शहरे जिथे उत्साह अन् संस्कृतीचा अद्भुत संगम! या दिवाळी सुट्टीत नक्की भेट द्या

Aarti Badade

युनिक दिवाळी सेलिब्रेशन २०२५

तुम्ही यंदाच्या दिवाळीत टूर प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात अशी ५ शहरे आहेत, जिथे दिवाळी पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येतात.

Sakal

अयोध्या (उत्तर प्रदेश)

भगवान श्री रामाची पवित्र नगरी. दिवाळीचा सण येथे दीपोत्सवाच्या स्वरूपात साजरा होतो. रामजन्मभूमी मंदिर, कनक भवन आणि संपूर्ण शहर लाखो दिव्यांनी उजळून निघते.

sakal

जयपूर (राजस्थान)

जयपूरमध्ये दिवाळीचा सण शाही थाटात साजरा होतो. रस्ते, बाजारपेठा आणि ऐतिहासिक राजवाडे आकर्षक दिव्यांनी सजतात. विशेषतः हवा महाल वधूसारखा दिसतो.

Sakal

अमृतसर (पंजाब)

दिवाळी येथे 'बंदी छोड़ दिवस' म्हणून साजरी केली जाते. श्री हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) लाखो दिव्यांच्या प्रकाशाने आणि रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघते.

Sakal

म्हैसूर (कर्नाटक)

कर्नाटकातील म्हैसूर येथे दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. जगप्रसिद्ध म्हैसूर पॅलेस खास दिव्यांनी सजवला जातो, हे दृश्य खूपच सुंदर आणि मनमोहक असते.

Sakal

वाराणसी (उत्तर प्रदेश)

दिवाळीनंतर येथे होणारी 'देव दिवाळी'. या दिवशी देवही दिवाळी साजरी करायला येतात, असे मानले जाते.गंगा घाट आणि काशी विश्वनाथ मंदिर दिव्यांनी उजळून निघतात.

Sakal

या शहरांचा अनुभव घ्या!

भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची दिवाळी साजरी करण्याची स्वतःची अनोखी शैली आहे. या ५ प्रमुख शहरांमधून तुमच्या दिवाळी टूरची योजना करा आणि संस्मरणीय अनुभव घ्या!

Sakal

ट्रेकर्सचं स्वर्ग! अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गाविलगड किल्ल्याला नक्की भेट द्या

Gawilgad Fort Amravati

|

Sakal

येथे क्लिक करा