Anushka Tapshalkar
केसांची निगा राखणे आणि निरोगी केस टिकवून ठेवणे बऱ्याच जणांसाठी अत्यावश्यक झाले आहे.
केस निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी बरेच व्हिटॅमिन्स मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया...
व्हिटॅमिन ए निरोगी केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सीबमच्या उत्पादनास चालना देते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज्ड राहतो आणि केस राठ किंवा रखरखीत होणे टळते.
व्हिटॅमिन बी, विशेषतः बी७ (बायोटिन) आणि बी९ (फॉलीक ऍसिड), हे केराटिनच्या निर्मितीसाठी, केसांच्या फॉलिकल्स बळकट करण्यासाठी आणि केसांचे एकंदरीत संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी गरजेचे आहेत.
व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडंट आहे जे लोह शोषते आणि कोलेजन निर्मितीसाठी मदत करते, जे केसांच्या मजबूतीसाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
केसांचे फॉलिकल्स कार्यरत राहावेत म्हणून व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर केस गळू शकतात, त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डीयुक्त आहार आवश्यक आहे.
व्हिटॅमिन ई अँटिऑक्सिडन्टसारखे काम करते ज्यामुळे स्कॅल्पवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होते. तसेच केसांच्या निरोगी वाढीस चालना मिळते आणि केस गळणे कमी होते.
केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.