संतोष कानडे
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भाजपला साधारण ६ हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. मात्र वैयक्तिक पातळीवर सर्वात जास्त देणगी देणारे खालीत पाच लोक आहेत.
सुरेश अमृतलाल कोटक यांनी भाजपला २० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी काँग्रेसलाही साडेसात कोटी रुपये दिले.
कोटक उद्योगपती असून त्यांना कॉटन मॅन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं.
अल्ला दक्षायानी यांनी भाजपला २५ कोटी रुपये देणगी दिली आहे. त्या रॅमकी फाऊंडेशनच्या संस्थापक आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.
त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल साडेचार हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ही कंपनी रस्ते, पर्यावरणावर काम करते.
दिनेशचंद्र अग्रवाल यांनी भाजपला २१ कोटी रुपये देणगीस्वरुपात दिले आहेत. ते डीआरए इन्फ्राकॉनचे संस्थापक आहेत.
अग्रवाल यांच्याच डीआरए कंपनीने भाजपला आणखी ६१.७८ लाख रुपयांची देणगी दिली.
हार्दिक अग्रवाल यांनी भाजपला २० कोटी रुपये देणगी दिली. ते दिनेशचंद्र अग्रवाल यांचे पुत्र आहेत.
डीआरए इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हार्दिक हे संचालक आहेत. त्यांच्या कपनीला १२१ किलोमीटर गुवाहाटी रिंग रोडचं कंत्राट मिळालं आहे.
रमेश कुन्हीकन्नन यांनी १७ कोटी रुपयांची देणगी भाजपला दिलीय. ते एक प्रसिद्ध, अब्जाधीश उद्योगपती आहेत.
म्हैसुरमधील केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड कंपनीचे रमेश कुन्हीकन्नन हे संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीनेसुद्धा भाजपला ११ कोटी रुपयांची देणगी दिली.