Monika Shinde
झाडं घरात लावली की त्याने फक्त घराची सजावटच होत नाही, तर ती आपलं आरोग्यही चांगलं ठेवण्यात मदत करतात.
त्यामुळे झाडं फक्त गच्चीत किंवा बागेतच नाही, तर घराच्या आतही लावायला हवीत.
स्नेक प्लांट स्टायलिश दिसतं आणि कमी देखभालीतही चांगलं वाढतं. हे झाड रात्रीही ऑक्सिजन सोडतं आणि हवेतील विषारी घटक दूर करतं. आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी चालतं. खोलीत किंवा ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी उत्तम पर्याय.
हे झाड घर सजवण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. ते हवेमधील विषारी वायू शोषून वातावरण स्वच्छ करतं. मनी प्लांट पाण्यात किंवा मातीमध्ये दोन्ही प्रकारे लावता येतो.
एलोवेरा सौंदर्यासाठीच नव्हे, तर स्वच्छ हवेसाठीही उपयोगी आहे. हे झाड हवेमधून घातक रसायने काढून टाकते. याला थोडं ऊन लागतं, पण जास्त पाणी दिलं तर मुळे सडू शकतात.
पीस लिलीला सुंदर पांढरी फुलं येतात, ज्यामुळे घराला एक सुंदर लुक मिळतो. हे झाड घरातील धूळ, अॅलर्जीक घटक आणि बुरशीसारखे कण दूर करतं.
हे झाड घरात ताजेपणा आणतं. त्याच्या पानांची सौम्य हालचाल मनाला प्रसन्न वाटते. अरेका पाम हवा थंड ठेवतो आणि आर्द्रता टिकवतो.