IPL मध्ये सर्वाधिकवेळा Not Out राहत मॅच जिंकून देणारे ५ खेळाडू

Pranali Kodre

आयपीएल

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम आहे.

IPL Trophy | Sakal

सर्वाधिकवेळा नाबाद

गेल्या १८ हंगामात अनेक विक्रम आत्तापर्यंत झाले आहेत. आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिकवेळा नाबाद राहणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेऊ.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

५. युसूफ पठाण

अष्टपैलू युसूफ पठाणने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २२ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवू दिला आहे.

Yousuf Pathan | Sakal

४. डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलरनेही आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २२ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे.

David Miller | Sakal

३. दिनेश कार्तिक

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २४ वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.

Dinesh Karthik | Sakal

२. रवींद्र जडेजा

अष्टपैलू रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २७ वेळा नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला आहे.

Ravindra Jadeja | Sakal

१. एमएस धोनी

आयपीएलमध्ये एमएस धोनीने धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक २८ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे.

MS Dhoni | Sakal

महत्त्वाचे

ही आकडेवारी २१ मार्च २०२५ पर्यंतची असून त्यात वेळेनुसार बदल होऊ शकतात.

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal

कोरोना काळात जुळले सूर... भारताचे स्टार हॉकीपटू अडकणार लग्नबंधनात

Mandeep Singh and Udita Duhan | Hockey | Instagram
येथे क्लिक करा