Winter Destinations: विंटर व्हेकेशनसाठी परफेक्ट! पाहा टॉप 5 निसर्गरम्य पर्यटनस्थळे

Monika Shinde

थंडीत

थंडीत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे तुमचे ट्रिप मूड फ्रेश करतील. चला तर जाणून घेऊया

महाबळेश्वर

थंडगार हवामान, स्ट्रॉबेरी गार्डन्स आणि धुक्याने भरलेले पॉइंट्स महाबळेश्वर हिवाळ्यात भेट द्यायलाच हवं असं सुंदर हिल स्टेशन आहे.

आंबोली

सह्याद्रीतील आंबोली हे धुक्याने माखलेलं, हिरव्यागार दऱ्यांनी सजलेलं निसर्गरम्य ठिकाण. हिवाळ्यात ट्रेकिंग आणि व्ह्यू पॉइंट्स विशेष आकर्षक दिसतात.

माथेरान

वाहन-मुक्त माथेरानमध्ये हिवाळ्यात शांतता, जंगलवाटा आणि सूर्यास्ताचं अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळतं. कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रिपसाठी उत्तम.

भिलार (बुक व्हिलेज)

निसर्ग, शांतता आणि पुस्तकांची दुनिया भिलार हिवाळ्यात अनोखा अनुभव देते. रिसॉर्ट्स आणि आजूबाजूचा हिरवा निसर्ग यात्रेला खास बनवतो.

बाणगंगा व्हॅली

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेली बाणगंगा व्हॅली हिवाळ्यात धुक्याने भरते. ट्रेकिंग आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी हे ठिकाण लपलेला खजिना आहे.

तपोला (मिनी काश्मीर)

शांत सरोवर, बोट रायड्स आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य तपोला हिवाळ्यात मिनी काश्मीरचा अनुभव देते. कपल्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशन.

अलिबाग

हिवाळ्यात गार वाऱ्यांसह शांत समुद्रकिनारे आणि वॉटरस्पोर्ट्स अनुभवायचे असतील तर अलिबाग सर्वोत्तम. छोट्या गेटवे ट्रिपसाठी खास ठिकाण.

कोकण कॉलिंग! नववर्षाची पहिली ट्रिप आंजर्ले बीचवर का करावी?

येथे क्लिक करा...