पुजा बोनकिले
तुम्हाला उन्हाळ्यात व्यवसाय सुरू करायचा असेल आणि फायदाच फायदा हवा असेल तर पुढील व्यवसाय करू शकता.
पुढील ६ व्यवसायातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
उन्हाळ्यात तुम्ही ताज्या फळांच्या रसाचा किंवा कोल्ड ड्रिंक्सचा स्टॉल लावू शकता. हायड्रेट राहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सेवन करतात. यामुळे हा व्यवसाय लाखो रूपये कमाई करून देऊ शकतो.
उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कुल्फीला मोठी मागणी असते. तुम्ही चॉकलेट, स्ट्रॉबेरी सारख्या वेगवेगळ्या चवींसह आइस्क्रीम आणि कुल्फी विकू शकता. भारतीय कुल्फी आणि मलाई कुल्फी देखील खूप लोकप्रिय आहेत.
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक स्विमिंग पुलचा क्लास लावतात. यामुळे तुम्ही उन्हाळ्यात स्विमिंग पुल ट्रेनर म्हणून व्यवसाय सूरू करू शकता.
उन्हाळ्यात हेल्दी ड्रिंक्स पिण्यावर सर्वांचा भर असतो. यामुळे तुम्ही हेल्दी ड्रिंक्सचा व्यवसाय करू शकता.
उन्हाळ्यात हा व्यवसाय करू शकता. अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देतात. तुम्ही इनडोअर समर फिटनेस क्लासेस सुरू करू शकता.
तुम्ही उन्हाळ्यात वॉटर पार्कचा व्यवसाय करू शकता. कारण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वॉटर पार्कमध्ये मज्जा करायला येतात.