Anushka Tapshalkar
प्रथिने शरीराच्या वाढीस, स्नायूंच्या मजबुतीस, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि ऊर्जेसाठी आवश्यक असतात. दररोजच्या आहारात प्रथिनयुक्त अन्नाचा समावेश आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
१०० ग्रॅम अंड्यात सुमारे १३ ग्रॅम प्रथिने असतात. अंडी ही सर्वसुलभ, पोषणमूल्यांनी भरलेली आणि सहज पचणारी आहेत. न्याहारीसाठी उत्तम पर्याय!
मासे आणि झिंगा-सारखे सीफूड १८–२५ ग्रॅम प्रथिनांनी भरलेले असते. त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सही भरपूर असतात, जे हृदय, मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
१०० ग्रॅममध्ये २७ ग्रॅम प्रथिने. स्नायूंची वाढ, वजन कमी करणे आणि ऊर्जा टिकवण्यासाठी अत्यंत प्रभावी.
१०० ग्रॅममध्ये सुमारे २२ ग्रॅम प्रथिने. आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन B12 ने भरलेले. योग्य प्रमाणात घेतल्यास शरीरासाठी उपयुक्त.
प्रत्येक १०० ग्रॅममध्ये ३ ते १० ग्रॅम प्रथिने. कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत. हाडं मजबूत ठेवण्यासाठी अत्यावश्यक.
चीजमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कॉटेज चीजमध्ये ११ ग्रॅम तर पार्मेजानमध्ये तब्बल ३३ ग्रॅम प्रथिने प्रति १०० ग्रॅम असतात. हे दोन्ही चीज प्रकार स्नॅक्स, सलाड्स किंवा जेवणात वापरले जाऊ शकतात.
डाळी, हरभरा, राजमा, क्विनोआ, टोफू हे प्रथिनांनी भरलेले वनस्पतीजन्य (Plant-Based Protein) पर्याय आहेत. शाकाहारींसाठी योग्य, पचायला हलके आणि पोषणमूल्यांनी समृद्ध!