सकाळ डिजिटल टीम
नैनीताल तलावांचं शहर हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेलं हे सुंदर शहर नैनी तलावासाठी प्रसिद्ध आहे. बोटिंग, रोपवे आणि थंड हवामान यामुळे पर्यटकांचं आवडतं ठिकाण.
मसुरी पर्वतांची राणी हे शांत आणि सुंदर हिल स्टेशन उन्हाळ्यातील निवासासाठी आदर्श. गन हिल, केम्प्टी फॉल्स, आणि मॉल रोड हे खास आकर्षण.
ऋषिकेश अध्यात्म आणि साहस गंगेच्या किनारी वसलेलं हे शहर योग, ध्यान आणि रिव्हर राफ्टिंगसाठी ओळखलं जातं. लक्ष्मण झुला हे प्रमुख आकर्षण.
हरिद्वार गंगेच्या आरतीचं शहर गंगा आरती, कुंभमेळा आणि धार्मिक महत्त्व असलेलं हे ठिकाण भारतातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
औली बर्फाचं स्वर्ग उत्तराखंडचं स्कीइंग हब. थंडीमध्ये बर्फाचं अप्रतिम सौंदर्य आणि नयनरम्य दृश्यं अनुभवायला मिळतात.
चोपता मिनी स्वित्झर्लंड शांततेसाठी आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध. तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला ट्रेक ही खास आकर्षणं.
भारताचं पहिलं वाघ प्रकल्प क्षेत्र. वन्यजीवप्रेमींना वाघ, हत्ती आणि विविध पक्ष्यांचे दर्शन घडवणारं ठिकाण.
केदारनाथ श्रद्धेचं केंद्र हिमालयाच्या कुशीत वसलेलं पवित्र तीर्थक्षेत्र. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.