Diamond Producing Countries : जगात सर्वात जास्त हिरे कोणत्या देशात आहेत? टॉप 10 देशांची नावे जाणून घ्या

Mayur Ratnaparkhe

रशिया -

जर आपण प्रमाणाच्या बाबतीत बोललो तर रशिया हा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे. रशियाच्या प्रमुख खाणींमध्ये उदाचनी, मिर्नी, ज्युबिली, ग्रिब यांचा समावेश आहे.

Russia

|

esakal

बोत्सवाना -

बोत्स्वानाच्या उच्च दर्जाच्या दगडांमुळे हे ठिकाण मूल्याने अव्वल हिरे उत्पादक आहे.  हिरे हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत.

esakal

कॅनडा -

कॅनडाने  नैतिक आणि शोधण्यायोग्य हिऱ्यांच्या खाणीसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली आहे. येथील हिरे गुणवत्ता, पारदर्शकतेमुळे जगभरात खूप लोकप्रिय आहेत.

Canada

|

esakal

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो -

हे ठिकाण नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे आणि बहुतेक औद्योगिक दर्जाचे हिरे तयार करते. येथील मुख्य खाण कसाई प्रदेश आहे.

Democratic Republic of the Congo -

|

esakal

ऑस्ट्रेलिया -

 हे ठिकाण गुलाबी हिरे आणि इतर दुर्मिळ रत्नांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील मुख्य खाण अर्गाइल आहे.  ऑस्ट्रेलिया अव्वल उत्पादकांपैकी एक आहे.

Australia

|

esakal

दक्षिण आफ्रिका -

दक्षिण आफ्रिकेतील हिऱ्यांच्या खाणीला ऐतिहासिक वारसा आहे. हा देश जागतिक बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रत्नांसाठी प्रसिद्ध आहे.

South Africa

|

esakal

झिम्बाब्वे-

झिम्बाब्वेतील मारेंज भागात हिऱ्यांचे प्रचंड मोठे साठे सापडले आहेत, ज्यामुळे हे क्षेत्र जगातील सर्वात मोठ्या हिरा साठ्यांपैकी एक मानले जाते.

Zimbamwe

|

esakal

नामिबिया -

नामिबियाची प्रमुख खाण किंवा क्षेत्र ऑफशोअर मरीन मायनिंग आहे. हे ठिकाण त्याच्या सागरी हिऱ्यांच्या खाणीसाठी ओळखले जाते..

Namibia

|

esakal

ब्राझील -

दक्षिण अमेरिकेतील हा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे.  ब्राझील रत्नांच्या दर्जाचे आणि औद्योगिक हिरे दोन्ही पुरवतो.

Brazil

|

esakal

अंगोला -

आफ्रिकेतील काही प्रमुख हिरे उत्पादकांपैकी हे एक ठिकाण आहे. येथील प्रमुख खाणी कॅटोका आणि लुआले आहेत.

Angola

|

esakal

Next : इंजिनियर असलेले भारतीय क्रिकेटपटू

Ravichandran Ashwin

|

Sakal

येथे पाहा