या नवरात्रीत पुण्यातील सर्वात भव्य दुर्गा पूजांचा अनुभव घ्या! ही आहे मंडळांची खास यादी

Anushka Tapshalkar

ओइक्योटन बांगिया परिषद, रामबाग कॉलनी

२०१२ साली स्थापन झालेल्या ओइक्योटन बांगिया परिषदेच्या कापसे लॉन्स, पिंपरी येथील दुर्गा पूजेला दररोज सुमारे १५,००० लोक येतात. हे पुण्यातील प्रमुख दुर्गा पूजांपैकी एक आहे.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

काली बारी मंदिर, रेंज हिल, खडकी

हे मंदिर देवी कालीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे बंगाली पद्धतीने दुर्गा पूजेचा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये पारंपरिक विधी, संगीत आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो.

पश्चिम पुणे बांगिया परिषद, बाणेर रोड

गोविंदा गार्डन, बाणेर रोड येथे २००४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळात दुर्गा पूजेचा उत्सव साजरा केला जातो. येथे सांस्कृतिक कार्यक्रम, बंगाली खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, ढुणुची नृत्य आणि सिंदूर खेळ यांसारख्या कार्यक्रमांसह मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

काँग्रेस भवन, शिवाजी नगर

बंगिया संस्कृती संमाजाने १९४० पासून आयोजित केलेली, काँग्रेस भवनातील पुण्यातील सर्वात जुनी बंगाली पद्धतीची दुर्गा पूजा आहे. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी येथे ३,००० पेक्षा जास्त लोक येतात.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

पुणेश्वरी कालीबारी, हडपसर

फुरसुंगीच्या पापडे वस्तीतील पुणेश्वरी कालीबारी, तिच्या नाजूक आणि आकर्षक मूर्ती सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजारो भक्त भेट देतात.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

आनंदम असोसिएशन, कोंढवा

पुण्यातील भव्य दुर्गा पूजांपैकी एक म्हणून ओळखला जाणारं, आनंदम असोसिएशनचं मंडळ त्यांच्या अत्यंत आकर्षक आणि भव्य सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. येथे बंगाली कला, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव साजरा केला जातो.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

आगोमनी प्रबासी संघ, नांदेड सिटी

पुण्यातील नांदेड सिटी येथील हा गट बंगाली परंपरेचे जतन करण्यासाठी दुर्गा पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करतो.

Top Durga Puja Mandals in Pune to Visit

|

sakal

Navratri 2025 Special: पुण्यातील टॉप गरबा आणि दांडिया इव्हेंट्स

Top Garba and Dandiya Nights in Pune 2025

|

sakal

आणखी वाचा