Aarti Badade
वजन कमी करण्यासाठी अंकुरलेले कडधान्य उत्तम मानले जाते. पण बहुतेक लोकांना वाटते की कच्चे कडधान्य खाणे आरोग्यदायी आहे, जे पचनासाठी हानिकारक असू शकते!
Sakal
पोषणतज्ञ खुशी छाब्रा यांच्या मते, कच्च्या कडधान्यांमुळे गॅस, पोटफुगी (Bloating) आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Sakal
कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर असले तरी, कच्च्या कडधान्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया पोटात संसर्ग किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात. म्हणून ते कच्चे खाणे टाळावे.
Sakal
खुशी सांगतात की, अंकुरलेले कडधान्य नेहमी हलके वाफवून (Steamed) किंवा परतून खावेत. यामुळे त्यांचे तंतू तुटतात आणि ते सहज पचतात.
Sakal
वाफवलेल्या कडधान्यांमध्ये आले, काळी मिरी, जिरे आणि सैंधव मीठ घाला. हे गरम मसाले घातल्याने ते अधिक पचण्याजोगे (Digestible) होतात.
Sakal
एका वेळी फक्त अर्धा ते एक कप अंकुरलेले कडधान्य खाणे चांगले. कॉटेज चीज, दही किंवा अंडी यांसारख्या प्रथिन स्रोतांसह (Protein Sources) ते खाल्ल्याने संतुलित जेवण मिळते.
Sakal
तुम्ही स्मूदी किंवा सॅलडमध्ये कडधान्य घालण्यापूर्वी, ते हलके शिजवा. यामुळे त्यांची चव वाढेल आणि पचन नक्कीच सुधारेल.
Sakal
Constipation Relief
Sakal