ग्लो, फेस लिफ्टिंग ते हायड्रेशन; 'हे' आहेत 2026 चे टॉप फेस मास्क ट्रेंड्स

Anushka Tapshalkar

2026 मध्ये फेस मास्क = स्किन मेंटेनन्स

आता फेस मास्क केवळ खास प्रसंगांसाठी नाहीत. प्रदूषण, स्क्रीन टाइम आणि बदलते हवामान यामुळे आठवड्यातून एकदा मास्क लावणे स्किन केअरचा आवश्यक भाग बनला आहे.

झटपट लिफ्ट व टोनिंग देणारे मास्क्स

कोलेजन, पेप्टाइड्स असलेले मास्क त्वचेला तात्पुरती घट्टपणा देतात, सैलपणा कमी दाखवतात आणि चेहरा अधिक टोन दिसायला मदत करतात.

डीप हायड्रेशनसाठी शीट मास्क

हायल्युरॉनिक अ‍ॅसिड शीट मास्क त्वचेला खोलवर ओलावा देतात, थकलेली त्वचा ताजीतवानी आणि प्लम्प दिसू लागते.

डिटॉक्स व एक्सफोलिएशन मास्क

चारकोल मास्क प्रदूषणामुळे साचलेली घाण काढतात, तर एन्झाइम मास्क मृत पेशी हलक्या पद्धतीने काढून ग्लो वाढवतात.

टेक्नॉलॉजी-बेस्ड मास्क ट्रेंड

LED फेस मास्क आणि क्रायो-कूलिंग जेल मास्क सूज कमी करणे, कोलेजन सपोर्ट आणि स्किन रिकव्हरीसाठी वापरले जात आहेत.

घरगुती देसी फेस मास्क अजूनही लोकप्रिय

मुलतानी माती, बेसन-हळद, चंदन पेस्ट आणि मध-दही मास्क त्वचा शांत करतात, तेलकटपणा कमी करतात आणि नैसर्गिक चमक देतात.

मास्क लावणं म्हणजे स्किन + माइंड केअर

मास्क लावल्यावर थोडा वेळ शांत बसणे तणाव कमी करते. त्यामुळे आजचे फेस मास्क फक्त स्किन सुधारत नाहीत, तर रिलॅक्सेशनही देतात.

जिम नाही, खर्च नाही! पोटाची ढेरी कमी करण्याचे 6 सोपे मार्ग

Belly fat reduction

| Sakal
आणखी वाचा