Aarti Badade
लसूण आणि आले यामध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
सुक्या मेव्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सांध्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
दही आणि ताक हे कॅल्शियमने समृद्ध असतात, जे हाडं मजबूत करतं आणि संधिवाताच्या लक्षणांपासून आराम देतं.
हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ हे अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहे, जे संधिवातामुळे होणारी सूज आणि वेदना कमी करू शकतं.
मेथी दाणे संधिवाताच्या वेदनांवर पारंपरिक उपाय म्हणून ओळखले जातात. ते संधिवातामध्ये सूज कमी करतात.
लिंबात व्हिटॅमिन C असते, जे सांध्यांतील कोलेजन टिकवून ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतं.
शरीरात डिटॉक्स प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी आणि सांध्यातील लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे.