Sandeep Shirguppe
शाबूदाणा (Sabudana) खाण्याचे अनेक फायदे आहेत. उपवासात याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.
ऊर्जेचा स्त्रोत म्हणून शाबूदाण्याकडे पाहिले जाते. हाडे मजबूत करण्यास शाबूदाणा उपयुक्त ठरेल.
शाबूदाण्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
शाबूदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.
शाबूदाण्यात लोह देखील असते, जे अशक्तपणा टाळण्यास मदत करते.
ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी शाबूदाणा एक चांगला पर्याय आहे.
शाबूदाण्यात ग्लुटेन नसते, त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे, तेही ते खाऊ शकतात.
शाबूदाणा नैसर्गिक असल्याने तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो.