Aarti Badade
१०० ग्रॅम मूगडाळीत जवळपास २४ ग्रॅम प्रथिनं असतात. वजन कमी करत असाल तरीही हा उत्तम पर्याय आहे.
पनीरमध्ये केसीन नावाचं प्रथिन असतं, जे हळूहळू पचतं आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतं.
टोफू हा सोयाबीनपासून तयार होतो. प्रथिनांनी परिपूर्ण आणि मांसाहाराचा दर्जेदार पर्याय आहे.
दही फक्त पचनासाठीच नव्हे, तर त्यातील प्रथिनं शरीराला शक्ती देतात. जिमनंतर हे उत्तम स्नॅक आहे.
हरभरा, चणाडाळ, चवळी यामध्ये प्रथिनं, फायबर आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात.
१०० ग्रॅम बदामांमध्ये जवळपास २१ ग्रॅम प्रथिनं असतात. आरोग्यदायी फॅट्सही मिळतात.
फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं यांचं संतुलन देणारा उत्तम नाश्ता.
क्विनोआमध्ये ९ आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात, हे धान्य संपूर्ण प्रथिन स्रोत मानलं जातं.
या पदार्थांचं सेवन तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य प्रमाणात करावं.